पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बाळद शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे .
बाळद गावापासून १ कि मी अंतरावरच्या वाल्मिक पाटील यांच्या शेतात त्यांनाच हा मृतदेह आधी आढळून आला . त्यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रवींद्र सोमवंशी यांना याबद्दल माहिती दिली त्यानंतर नगरदेवळा पोलीस चौकीमध्ये सहाय्यक फौजदार कैलास पाटील यांना ही माहिती देण्यात आली . त्यानुसार सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील आणि पो कॉ विनोद पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .
हा मयत अनोळखी पुरुष अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचा असून त्याच्या अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट आहे या शेतापासून रेल्वेमार्ग जवळ असल्याने तो रेल्वेतून पडला किंवा आलेला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पोलिसांनी त्याची ओळख पटवण्यासाठी काही नागरिकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र ठामपणाने त्यांना माहिती मिळू शकली नाही . नितीन पाटील , राजेंद्र मोरे , रवींद्र सोमवंशी , दिलीप मोरे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी पोलिसांना सहकार्य केले नंतर पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोऱ्याच्या सरकारी रुग्णालयात पाठवला .