जळगाव ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्यातील आरोपीला जरंडी येथून अटक करण्यात जळगाव गुन्हे शाखेला यश आले आहे.
आरोपीने घरफोडीची कबुली देत 22 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल काढून दिले आहे. या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. साईदास भगवान राठोड (22, रा.मंगलपुरी, रामेश्वर कॉलनी जळगाव, ह.मु. जरंंडी, ता.सोयगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
ही कारवाई एएसआय अशोक महाजन, हवालदार लक्ष्मण पाटील , संदीप सावळे, नाईक किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, कॉ विनोद पाटील, ईश्वर पाटील, चालक मुरलीधर बारी यांच्या पथकाने केली. आरोपी साईदास राठोड याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात घरफोडीची कबुली दिली आहे. आरोपीला पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.







