मुंबई ( वृत्तसंस्था ) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास मागील आठवड्यापासून जाणवू लागला आहे. मुख्यमंत्र्यांवर दिवसांत शस्त्रक्रिया होणार आहे गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. डॉ. शेखर भोजराज हे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार आहेत .
उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यांनी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणी केली होती. काही शारीरिक चाचण्याही केल्या होत्या.
अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त वर्षा बंगल्यावर पाहुण्यांकडून शुभेच्छा घेणेदेखील टाळले होते. उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता आहे.







