जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आता ११ तालुक्यांमधील सोसायटी मतदार संघातील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे . चोपडा , रावेर , यावल आणि भुसावळ या चार तालुक्यांमधील सोसायटी मतदार संघांसाठी मात्र निवडणूक अटळ आहे.
आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपले सगळे उमेदवार मागे घेतल्याने हा महत्वाचा परिणाम दिसून आला आहे. त्यातल्या त्यात जिल्हा बँक निवडणुकीत सोसायटी मतदारसंचांची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते बहुतेक स्थानिक नेत्यांचे या निवडीकडे लक्ष असते कारण या सोसायटी मतदारसंघातील यश – अपयशाचा प्रभाव राजकारणावर पडत असतो . मात्र आता भाजपने बहिष्कार टाकल्याने तुल्यबळ लढतीची शक्यता मावळली आहे.