जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत आता चोपडा सोसायटी मतदारसंघातून तिरंगी लढत अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे . भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले असले तरी या मतदारसंघातून भाजप उमेदवाराने माघार घेतलेली नाही त्यामुळं भाजपच्या २३ उमेदवारांची माघार आतापर्यंत झालेली आहे .
चोपडा सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार संगीता प्रदीप पाटील यांची उमेदवारी कायम असल्याने ही लढत तिरंगी होणार आहे . जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील आणि राष्ट्रवादीकडून अरुण गुजराथी यांचे समर्थक घनश्याम अग्रवाल हे दोन तुल्यबळ उमेदवार आहेत . संगीता पाटील यांची आता मतदानाच्या तारखेपर्यंत काय भूमिका समोर येते त्यावर राजकीय जाणकारांचे लक्ष राहणार आहे.