जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि त्यांच्या पत्नी संगीता भंगाळे यांनीही माघार घेतली .
संगीता भंगाळे यांनी महिला राखीव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विष्णू भंगाळे यांनी ओ बी सी आणि इतर संस्था मतदार संघातून अर्ज दाखल केले होते . हे दोन्ही अर्ज त्यांनी आज मागे घेतले . या निवडणुकीत महाविक्स आघाडी असल्याने आपण पक्षासाठी माघार घेत असल्याचे यावेळी विष्णू भंगाळे यांनी सांगितले . यावेळी माजी मंत्री सतीश पाटील हे ही यावेळी उपस्थित होते.