रायपूर ( वृत्तसंस्था ) – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार केला आहे. या घटनेत चार जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. शहीद आणि जखमी सर्व जवान केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आहेत. गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव रितेश रंजन आहे.
रितेश रंजन नावाच्या जवानाने पहाटे पावणेचार वाजताच्या सुमारास लिंगालापल्ली येथे सहकारी सात सैनिकांवर गोळीबार केला. यात सात जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने भद्राचलम परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यातील चौघांचा मृत्यू झाला तिघांवर उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.