पहूर, ता. जामनेर ( प्रतिनिधी )- पहूर ते शेंदुर्णी रोडवर सांगवी शिवारात काल सायंकाळी अनोळखी व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली
शेतकरी ईश्वर नामदेव क्षीरसागर यांच्या शेताचे बांधावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेणाऱ्या या इसमाची ओळख पटलेली नसुन ओळख पटवण्यासाठी पहूर पोलीस स्टेशनचे पी. आय. अरुण धनवडे यांनी आवाहन केले आहे.