पहूर ता. जामनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील वाकडी येथील महिला शेतात काम करत असतांना शेताच्या वादातून तिचा विनयभंग करणाऱ्या दोघांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकडी येथील महिला कुटुंबियांसह राहते. ६ नोव्हेंबररोजी त्या पती व मुलासह वाकडी शिवारातील शेतात कपाशी वेचण्याचे काम करत असतांना संशयित आरोपी वसीम सिकंदर शहा (वय-३५ रा. वाकडी ) आणि शेरू शहा दिल शहा (वय-३२ , रा. खामगाव जि. बुलढाणा ) हे शेतात येवून ही शेती आमची आहे, शेतातून निघून जा असे सांगून महिलेला शिवीगाळ करून विनयभंग केला. महिलेचे पती आणि मुलाला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिेलेच्या फिर्यादीवरून दोघांवर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण चौधरी करीत आहेत.