नागपूर ( वृत्तसंस्था ) – काही दिवसांपासून नागपुरात गुन्हे वाढत आहेत काल मध्यरात्री नागपुरात एका गुंडाच्या हत्येची थरारक घटना घडली घराबाहेर बसल्याच्या रागातून संबंधित गुंड तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली यशोधरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला
जफर अब्बास बरकत अली असं हत्या झालेल्या गुंडाचं नाव असून तो नागपूर जिल्ह्याच्या कामठी येथील रहिवासी आहे. मृत जफर हा कामठी परिसरातील गुंड असून त्याच्याविरोधात बरेच गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी मध्यरात्री जफर आरोपीच्या घरासमोर बसला होता. बराच वेळ घरासमोर बसल्याने आरोपीनं त्याला हटकलं.
घरासमोर बसल्याच्या कारणातून दोघांमधील वादात ठिणगी पडली. वाद विकोपाला गेला. संतापलेल्या आरोपीनं जफर याची निर्घृण हत्या केली आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला दोन दिवसांपूर्वी नागपुरात एका कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. एका टोळक्यासोबत झालेल्या वादानंतर गुंडाची हत्या करण्यात आली होती.
संबंधित गुंडाचं नाव फ्रँक अँथनी असं होतं. फ्रॅंकच्या हत्येची घटना ताजी असताना नागपुरात आणखी एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे.