पुणे ( वृत्तसंस्था ) – पोलिस कर्मचाऱ्यांच्या त्रासाला वैतागून पोलीस महिलेनेच गळफासाने आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील देलवाडी येथे घडली.
बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास दिपाली बापुराव कदम ( वय-26 रा. देलवाडी, सध्या लोकरी मणिकपूर वसई मुंबई) यांनी आत्महत्या केली या आत्महत्येमुळे राज्य पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मयत दिपाली कदम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी भाऊ रोहितला मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली पोलीस नाईक वाल्मीक अहिरे (रा. पालघर, मुंबई) याच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. दोन वर्षापूर्वी दिपाली कदम यांची पोलीस खात्यातील वाल्मीक अहिरे याच्यासोबत ओळख झाली होती. नंतर आरोपी अहिरे वारंवार दिपालीला शाऱीरिक व मानसिक त्रास देत होता.
दिपालीचे नुकतेच लग्न जमले होते. 16 नोव्हेंबररोजी मयूर कांबळे यांच्यासोबत विवाह होणार होता. साखरपुडा आणि लग्नासाठी त्या मुळगावी आल्या होत्या. दिपालीचे लग्न जमल्याचे समजल्यानंतर वाल्मीक अहिर याने तिच्या होणाऱ्या पतीला आणि त्यांच्या वडिलांना फोन करुन दिपाली संदर्भात माहिती दिली. वाल्मीक अहिरे याने मंगळवारी रात्री दिपालीचा भाऊ रोहितला फोन करुन तुम्ही तिचे इतर कोणाशी लग्न करु नका नाहीतर तुम्हाला मारुन टाकेल अशी धमकी दिली.
मंगळवारी रात्री कुटुंबाने दिपालीला समजावून सांगितले. बुधवारी पहाटे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपालीचा भाऊ रोहित कदम यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली