जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील रेल्वे मालधक्का माथाडी कामगार सेनेतर्फे 450 हमाल बांधवांना दीपावलीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली 50 भगिनींना साडी व मिठाई देऊन सत्कारही करण्यात आला.
यावेळी माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे , सागर पहेलवान सोनवणे, योगेश गालफाडे , रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकेश उर्फ आबा बाविस्कर , केशव पोळ लक्ष्मण पोळ, विजय पुरोहित, सचिन पुरोहित , सिताराम पुरोहित , राधेश्याम व्यास, माथाडी निरीक्षक श्री वाघ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी लहू हटकर , राजू भाट, विक्की माने , संतोष हटकर , सुरेश बाविस्कर , राजू जोंटी, भिकनमामु शेख, ब्रिजलाल नाईक , धनसिंग पवार , शंकर ठाकूर , छोटू कोळी , विजय पवार, चतरु मामा , वना पाटील, अशोक जाधव , मधुकर रोकडे, घनश्याम जगताप , अजय नाईक, गजानन ठाकरे , नेहरू बाबा, विठ्ठल राव ,दरबार चव्हाण, शब्बीर बाबा ,पवन पाटील, आदींसह हमाल माथाडी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकेश उर्फ आबा बाविस्कर यांनी केल्याने सर्व सहकार्यान्चा आनन्द द्विगुणित झाला .