जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मासूमवाडीजवळच्या सय्यदनगरात काल रात्री झालेल्या घरफोडीच्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी ५५ हजारांचा ऐवज लंपास केला .
प्लॉटिंग ब्रोकरचा व्यवसाय करणारे फिर्यादी शेख सलीम शेख रशीद हे सय्यदनगरात कुटुंबियांसह राहतात . काल रात्री साडे अकराच्या सुमारास ते कुटुंबियांसह झोपी गेले होते आज सकाळी ६ वाजता जाग आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले . त्यांनी घराची पूर्ण पाहणी केली तेंव्हा मुख्य दरवाजा अर्धवट उघडलेला होता ते ज्या खोलीत झोपलेले होते त्या खोलीचा कडीकोंडा उघडलेला होता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते . अज्ञात चोरट्यांनी घरातील २५ हजार रुपये रोख रकमेसह ७ हजारांचे २ मोबाइल , २३ हजारांच्या चांदीच्या १२ अंगठ्या व पेंडल , ५०० रुपयांचे पितळी भांडे असा ५५ हजारांचा ऐवज लंपास केला . शेख सलीम यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे .