जळगावच्या गणपतीनगरातील तारा अपार्टमेंट आवारातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – प्राणीप्रेमी नागरिकांच्या निरोपाला प्रतिसाद देत आज अग्निशमन दलाच्या पथकाने अत्यंत दक्षतेने आणि चपळाईने केलेल्या प्रयत्नांमुळे कुत्रीच्या पिलाला जीवदान मिळाले .
शहरातील गणपतीनगर मध्ये बंद असलेल्या तारा अपार्टमेंटच्या बोअरवेलमध्ये साधारण दोन महिने वयाचे कुत्र्याचे पिल्लू पडले होते. तेथील नागरिकांनी २ वेळा प्रयत्न केले पण ते असफल झाले. त्यांनी जळगाव महानगरपालिका अग्निशमन दलाला फोन केला. व अग्निशमन पथकांने घटनास्थळी जाऊन दोर व हुकच्या सहाय्याने २ वेळा प्रयत्न केला. व तिसऱ्या वेळी त्या पिलाला सुखरूप बाहेर काढले
जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या प्रदीप धनगर, प्रकाश चव्हाण, भगवान जाधव, नितीन बारी या कर्मचाऱ्यांनी ही बचाव मोहीम यशस्वी केली. अग्निशमन दलाला संध्याकाळी ५ . ४५ वाजता कॉल आला होता. साधारण १५ मिनिटात घातस्थळी पोहचलेल्या या पथकाने तासाभरात या पिलाला बाहेर काढले.