जळगाव ( प्रतिनिधी ) – बिलाल चौकात किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. परस्परविरोधात तक्रारींवरून सहा जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या गटातील रईस शेख रशीद शेख (वय-२२ , रा. मच्छी बाजार, तांबापूरा ) कुटुंबियांसह राहतात. १ नोव्हेंबररोजी सकाळी रईस शेख मित्रासोबत दुचाकीने मामाच्या मुलाच्या साखरपुड्याला साजीत असलम कुरेशी याच्या घरासमोरून जात असतांना बबलु याने “गाडी बघून चालव” असे सांगितले. त्यावर “तू तुझे पाहा” असे रईसने सांगितल्याचा राग आल्याने बबलु कुरेशी, इकबाल कुरेशी, शाहरूख कुरेशी आणि शोएब कुरेशी या चौघांनी लाकडी पाट्याने बेदम मारहाण करून जखमी केले.
रईस शेख यांच्या फिर्यादीवरून बलु कुरेशी, इकबाल कुरेशी, शाहरूख कुरेशी आणि शोएब कुरेशी (सर्व रा. बिलाल चौक) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटातील सिरीन बानो रियाज कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिरसाजीत असलम कुरेशी घरासमोर उभा असतांना रईस खेख रशीद शेख व जुनेद साजीद हे दुचाकीने जात असतांना ते दुचाकीवरून घसरले. दोघे खाली पडल्याने त्यांनी उचलण्यासाठी बबलु कुरेशी हा जवळ गेला असता रईसने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी दोघांनी वखार मधून लाकडे पाट्या आणून मुलगा शहीद कुरेशी याला बेदम मारहाण केली. तर मुलगा व पती यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सिरीन बानो कुरेशी यांच्या फिर्यादीवरून रशीद शेख व जुनेद साजीद (रा. बिलाल चौक ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पुढील तपास पोहकॉ नितीन पाटील करीत आहेत.







