भुसावळ ( प्रतिनिधी ) – प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा यांच्या फेरनियुक्तीच्या वादात सरस्वती विद्या प्रसारक मंडळाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे
शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा यांनी प्राचार्य पदाचा कालावधी 7 फेब्रुवारी 2017 पर्यंत पूर्ण केला मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 30 जून 2010 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार/नियमानुसार संस्थेने निवड समिती बोलावून 8 फेब्रुवारी 2017 त्यांची पुनर्नियुक्ती अथवा दुसर्या प्राचार्यांची नेमणूक करणे गरजेचे असतानाही संस्थेने तशी कार्यवाही न करता त्यांनाच पूर्ववत ठेवले. या संदर्भात तक्रारी करण्यात आल्यानंतर प्राचार्य साबद्रा यांची मान्यता रद्द करण्यात आली व संस्थेला कारवाईचे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. या निर्णयाविरुद्ध सरस्वती विद्या प्रसारक मंडळ (संस्था) व प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा यांनी विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाविरुद्ध औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली मात्र उच्च न्यायालयाने ती फेटाळली असल्याची माहिती सी.ए.दिनेश राठी यांनी दिली.