जळगाव ( प्रतिनिधी ) – ओल्या दुष्काळासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले . हजारो शेतकऱ्यांच्या सहभागाने या मोर्चात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तीव्रता पुन्हा अधोरेखित केली .
गेल्या २ वर्षात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची दुर्दशा केली आहे त्यामुळे आता आंदोलन तीव्र करू ; मंत्र्यांना अडवू असा इशारा आज आमदार गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या जनआक्रोश मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात दिला
आमदार गिरीश महाजन , आमदार मंगेश चव्हाण , आमदार राजूमामा भोळे , आमदार संजय सावकारे , खासदार उन्मेष पाटील ,खा. रक्षाताई खडसे, जि प अध्यक्षा रंजना पाटील , आ. चंदुभाई पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले . कोर्ट चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून भाजपच्या शेतकरी मोर्चाला प्रारंभ झाला. आजचा भाजपचा जनआक्रोश मोर्चा महाविकास आघाडी सरकारविरोधी घोषणांनी दणाणला होता. पालकमंत्र्यांनी ३ दिवसांपूर्वी केलेला दावा खोडून काढत आमदार गिरीश महाजन यांनी आम्ही आमच्या भूमिकेवर सांगितले. जिल्ह्यात शेतकऱ्यांना १ रुपयाही भरपाई पुनरुच्चार त्यांनी केला . आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा प्रचंड यशस्वी झाल्याचा दावा भाजपने केला आहे . या वास्तवावरून तरी सत्ताधारी नेत्यांनी बोध घ्यावा असा टोमणा मारत आयोजकांनी सरकारच्या उदासीनतेवर बोट ठेवले.
मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना महाविकास आघाडीच्या सरकारचे जुलूम इंग्रजांसारखे आहेत . यांनी फक्त मोठ्या गोष्टी केल्या . पालकमंत्री गुलाबराव पाटील काहीतरी करतील असे होते पण ठरल्या यंदा शेतकऱ्याची दिवाळी गोड नाही दिवाळी सोडून येथे शेतकरी सरकारच्या मढयावर आले आहेत. आता आंदोलनाची तीव्रता वाढावी लागेल , असा घणाघात आज आमदार मंगेश चव्हाण यांनी आज शेतकरी मोर्चामध्ये केला खासदार उन्मेष पाटलांनी आज शेतकरी मोर्चात पालकमंत्र्यांवर टीका केली. राष्ट्रवादीच्या नादी लागून या शिवसेनेच्या वाघाची शेळी झाली असल्याचे ते म्हणाले यावेळी खासदार रक्षा खडसे , आमदार राजूमामा भोळे यांचीही भाषणे झाली .
खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला शेतीला पाण्याची गरज असताना शेतीसाठी असलेल्या वीज जोडण्या सक्तीच्या वीज बिल वसुलीसाठी कापल्या जात आहेत . ही सक्तीची वसूली तात्काळ थांबवावी . शेतीसाठी वीज पुरवठा करणारे नादुरुस्त ट्रान्सफार्मर्स तात्काळ बदलावेत . रात्रीपेक्षा दिवस नियमित शेतीसाठी वीजपुरवठा व्हावा . अतिवृष्टीग्रस्तांना दिलेली तुटपुंजी मदत तात्काळ वाढवावी . पीक विमा योजना २०२१ अंतर्गत कापूस , उडीद , मूग , सोयाबीन उत्पादक पात्र शेतकऱ्यांना तात्काळ लाभ द्यावा २०१९ आणि २०२१ सालातील शेतीची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी , अशा मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर आ. गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, आ. राजुमामा भोळे,खा.उन्मेष पाटील, भाजपचे महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी , प्रल्हाद पाटील , के बी ,साळुंखे विशाल त्रिपाठी , महेश जोशी , जयपाल बोदडे , नितीन इंगळे , चंद्रशेखर अत्तरदे , भगत बालाणी , राकेश पाटील , राजेंद्र घुगे पाटील , सोमनाथ पाटील , हर्षल पाटील रवींद्र पाटील आदींच्या सह्या आहेत.