चोपडा ( प्रतिनिधी) – गावठी कट्टे बाळगणारा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यातील आरोपी सतनामसिंग महारसिंग जुनेजा (वय २२) याला घेऊन चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कृषीकेश रावळे (आयपीएस), ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो नि देविदास कुनगर व पथकाने मध्यप्रदेशातील उमर्टी येथील सतनामसिंग जुनेजा याच्या घरात जाऊन गावठी कट्टा बनवण्याचे साहित्य वरला पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले
मध्यप्रदेशातील उमर्टी येथून देशात सर्वत्र चोपडामार्गे गावठी कट्टे पार्सल होतात. आजपर्यंत गावठी कट्टा बनविण्याच्या अड्ड्याचा पोलिसांना थांगपत्ता लागत नव्हता यावेळी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तीन दिवसांपूर्वी तीन कट्टे घेऊन जात असताना नाशिक येथील पोलिस पथकाच्या मदतीने ताब्यात घेतलेला आरोपी सतनामसिंग जुनेजाला सोबत घेऊन तो राहत असलेल्या घरात गावठी कट्टा बनविण्याचा अड्डा उध्वस्त केला
चोपडा ग्रामीण व शहर पोलीसनी कट्टा बनविणारे साहित्य मध्यप्रदेशातील वरला पोलिसांच्या मदतीने जप्त केले ही पोलिसांची मोठी कारवाई असून येणाऱ्या काळात पोलीस उपविभागीय अधिकारी रावळे व शहर, ग्रामीण पोलिसांच्या मदतीने गावठी कट्ट्यांचा धंद्याला लगाम लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.कारवाईत चोपडा ग्रामीणचे पो उ नि अमरसिंग वसावे, शहराचे पो उ नि विनोद पाटीलसह पोलिसांचा ताफा उपस्थित होता.