जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील बस स्थानकातून प्रवाशाची लॅपटॉपसह बॅग चोरणाऱ्या चोराला रेल्वे स्थानकात संशयास्पद स्थितीत फिरताना रेल्वे पोलिसांनी संशयातून ताब्यात घेतल्यानंतर पकडण्यात आले .
सध्या दिवाळीनिमित्त बस स्थानकात प्रवाशांची गर्दी आहे . जिशान अशपाक पिंजारी ( रा – अमळनेर ) हे नांदेड येथे गेले होते . नांदेड येथून अमळनेरला जाण्यासाठी ते जळगावला बसस्थानकावर आले होते त्यांचेकडे 4 बॅग होत्या त्यांची अमळनेर बस आली त्यावेळी त्यांना जागेवर चारपैकी तीनच बॅग दिसल्या कोणीतरी बॅग नेल्याचे लक्षात आल्यावरही 3 बॅग घेऊन ते अमळनेर येथे निघून गेले.
बॅग चोरणारा चोरटा रेल्वे स्टेशन येथे बॅगसह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने रेल्वे पोलिसांनी त्याची चौकशी केली . बॅग कोठून आणली व कोणाची या प्रश्नांची उत्तरे तो रेल्वेचे पो उ नि राजेंद्र पाटील, स पो नि राजेश पुराणिक, हे कॉ सचिन पाटील याना देऊ शकला नाही नंतर रेल्वे पोलिसांनी, जिल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधला जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पो कॉ जुबेर तडवी, हे कॉ साहेबराव खैरनार यांनी रेल्वे स्थानकात जाऊन त्याची चौकशी केली त्याने त्याचे नाव बब्बू भय्यालाल धुर्वे ( 39 वर्ष रा उमरखेडा खुर्द ता.जि. छिंदवाडा , मध्य प्रदेश ) असे सांगितले बॅगबाबत काही सांगत नव्हता बॅगमध्ये लॅपटॉप व नावासह मोबाईल क्रमांक असलेली चिठ्ठी सापडली पोलिसांनी मोबाईलवर संपर्क साधला बॅग व लॅपटॉपची फोटो संबंधितांना पाठविले पोलिसांनी पिंजारी यांना जळगाव येथे बोलाऊन घेतले या चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन पिंजारी त्यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला पो नि रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली स पो नि महेंद्र वाघमारे, पो ना संदीप पाटील यांनी ही कारवाई केली .