सांगली ( वृत्तसंस्था ) – जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे शुक्रवारी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली बापाला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी तरुणाने मित्राच्या मदतीने चार जणांना बेदम मारहाण केली मारहाण इतकी भयंकर होती की, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला व दुसरा उपचारादरम्यान दगावला.
आरोपींनी लाथा बुक्क्या, काठी, ऊस अशा मिळेल त्या वस्तूने मारहाण करत चार युवकांना अक्षरश: रक्तबंबाळ केलं दुहेरी हत्याकांडाच्या या थरारक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
कडेगाव पोलिसांनी घटनास्थळी मुख्य आरोपी मधुकर मोरे याला अटक केली त्याचा अन्य साथीदार विशाल चव्हाण फरार आहे. विहापूर येथील रहिवासी गणेश कोळी, गोरख कावरे आणि विजय माने यांनी गुरुवारी किरकोळ कारणावरुन आरोपी मधुकर मोरे याचे वडील उत्तम मोरे यांना मारहाण केली होती. वडिलांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच आरोपी मधुकर मोरे याला संताप अनावर झाला.
शुक्रवारी रात्री आरोपींनी गणेश कोळी, गोरख कावरे आणि विजय माने या तिघांना काठी, दांडके, ऊस अशा मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण केली तिघांचा मित्र संदीप चव्हाणला घराबाहेर बोलवून अमानुष मारहाण केली
मारहाणीत संदीप चव्हाण याचा घटनास्थळीच मृत्यू झाला विजय माने गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी त्याला सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं.उपचार सुरू असताना माने याचादेखील मृत्यू झाला पोलिसांनी मुख्य आरोपी मधुकर मोरे याला अटक केली त्याचा साथीदार विशाल चव्हाण मात्र फरार झाला.