काबूल ( वृत्तसंस्था ) – अफगाणिस्तानात लग्नात संगीत वादनाने भडकलेल्या कट्टरतावादी तालिबान्यांनी १३ जणांना मारून टाकले .
अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याच्या वापसीनंतर तालिबानच्या भितीनं हजारो लोकांनी देश सोडला आहे. हे सर्व लोक तालिबानची क्रूरता आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या नियमांमुळे भयभीत होते. तालिबानचा क्रूरपणा आता पुन्हा समोर आला आहे. नांगरहार प्रांतात तालिबानने 13 जणांची निर्घृण हत्या केली तालिबानच्या या क्रूर कृत्याबद्दलचा खुलासा माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी एका ट्विटमध्ये केला आहे.
अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने ते आपल्या अधिपत्याखालील नागरिकांना हक्क देतील आणि आता 90 च्या दशकातील तालिबान राहिलेले नाही. परंतु तालिबानी या मुद्द्यावर फार काळ टिकू शकले नाहीत. माजी उपराष्ट्रपतींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तालिबानने 13 निरपराध लोकांना केवळ लग्नाच्या कार्यक्रमात गाणी वाजवल्यामुळे मारले. त्यांना ही गाणी बंद करायची होती. त्यांनी पुढे लिहिले की, प्रतिकार ही राष्ट्रीय गरज आहे आणि आपण फक्त निषेध करून राग व्यक्त करू शकत नाही. माजी उपराष्ट्रपतींनी तालिबानच्या या क्रूरतेसाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. अफगाण संस्कृती मारण्यासाठी आणि आमच्या देशावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तानने त्यांना 25 वर्षे इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस-अनुपालन धर्मांधतेचे प्रशिक्षण दिले आणि आता त्यांचे काम सुरू झाले आहे.
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा नागरिकांच्या हत्यांचे पर्व सुरू झाले आहे. अफगाणिस्तानातील लोक तालिबानच्या नियमांना घाबरत आहेत. तालिबानने टीव्हीवर संगीत आणि महिलांचे आवाज ऐकण्यावरही बंदी घातली आहे.