जळगांव ( प्रतिनिधी ) – ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयासाठी आज इकरा युनानी मेडिकल कॉलेज येथे कोरोना लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरणाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार यांचे हस्ते करण्यात आले. लसीकरण विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी होते.
प्राचार्य ईरफान ईकबाल शेख यांनी युनानी मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. शोएब शेख यांच्या हस्ते कोरोनाची लस घेतली. विद्यार्थी व पालकांनीही लस घेतली.
यावेळी एजाज मलीक, अ. अजीज सालार, अमिन बादलीवाला , अ. रशीद शेख, जफर शेख, नबीदादा बागवान, प्रा. फरीदा लेहरी, प्रा.व्ही.टी पठाण, प्रा. अजीम शेख, प्रा. वसीम शेख, प्रा. डॉ. ईश्वर सोनगरे, रईस अमीर, सैय्यद मुख्तार, मिर्झा जाहिद उपस्थित होते.