जळगाव, (प्रतिनिधी ) – आगामी सणासुदीचा व गर्दीचा हंगाम लक्षात घेता मोठया प्रमाणात खाजगी कंत्राटी बसेसचा वापर करण्यात येतो. खाजगी वाहतूकदारांकडून गर्दीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. खाजगी वाहनांच्या भाडेदरासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत उच्च न्यायालयाने खाजगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचे आदेश शासनास दिले होते.त्यांनुसार हे दर आता निश्चित करण्यात आले आहेत .
राज्यातील खाजगी वाहनांचे कमाल भाडेदर राज्य परिवहन महामंडळाच्या त्याच स्वरुपाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती किलोमीटर भाडेदराच्या 50% पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर गृह विभाग यांचे शासन निर्णय ( क्र. एमव्हीआर-0412/प्र.क्र.378/(पु.बा.07) परि.2 दि. 27 एप्रिल, 2018 ) अन्वये निश्चित करण्यात आले आहे.
जळगाव शहरातून खाजगी बसेस पुणे, मुंबई, नागपूर, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात.. खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवशांकडून किती भाडे आकारावे याबाबतचा तक्ता तयार करुन प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स कार्यालयात फलक लावणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. .
कोणत्याही खाजगी वाहतूकदाराकडून निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादाभाडे आकारणी केल्याबाबत तक्रार mh१९@mahatranscom.in व dycommr.enf२@gmail.com या संकेतस्थळावर करावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.