मुंबई (प्रतिनिधी) – सरकारकडे आमदार खासदारांचा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत, एस. टी. कर्मचार्यांचा पगार आणि पोलिसांचा बोनस देण्यासाठी तिजोरीत खडखडाट का? असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केला आहे.
विद्रोही पत्रकार डॉ राजन माकणीकर म्हणाले की, पोलीस यंत्रणा सुरक्षा कवच असून यांच्यामुळेच समाज निर्धास्त असतो, एस टी व पोलीस या दोन्ही क्षेत्रात गरीब आणि शेतकरी पुत्र कामाला असून दिवसरात्र जीवाची पर्वा न करता सेवा देतात. वृद्धापकाळात अनेक रोगांमुळे ते ग्रासलेले असतात यामुळे यांना किमान मोबदला देणे महत्वाचं आहे
सत्ताधाऱ्यांनी 1 महिण्याचा पगार कपात करून पोलिसांना बोनस व वेतन देऊन त्यांचा दीपावलीत सन्मान करावा एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुद्धा सरकारने सकारात्मक विचार करावा अन्यथा पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आंदोलन करू. असा इशाराही राजन माकणीकर यांनी दिला.