जळगाव ( प्रतिनिधी ) – नाशिकच्या छत्रपती संभाजी राजे बहुद्देशीय संस्थेच्यावतीने ‘राज्यस्तरीय शिवपुत्र व शिवकन्या महाराष्ट्र गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला आहे .
जळगाव शहरातील “कांताई सभागृहात”दुपारी होणाऱ्या या सोहळ्यात सामाजिक, राजकीय, शिक्षण आणि प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत गुणिजनांचा सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मॅगसेसे पुरस्कार विजेत्या पदमश्री निलिमा मिश्रा, आ.डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ.दुर्गा तांबे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. बी व्ही पवार, दैनिक लोकशाहीचे सल्लागार संपादक धो ज गुरव उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोने आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी ही माहिती दिली.