मालेगाव ( प्रतिनिधी ) – मालेगावात एसटी चालकाच्या मुलानं आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला आहे. या मुलावर मालेगावात खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलं आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं या प्रमुख मागणीसह महागाई भत्ता , घरभाडे आणि पगार यासह इतर मुद्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. राज्य सरकारनं 28 ऑक्टोबरला एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली होती. त्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन संपलेलं नाही. काही संघटनांनी आंदोलन सुरु ठेवलं आहे. अहमदनगरमध्ये काल एका एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली होती.
मालेगावात एसटी चालकच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मालेगावात शिवप्रसाद शिंदे यांच्या मुलानं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. वडिलांना एसटीकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात मनासारखं शिक्षण घेता येत नाही त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. शिंदे यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अहमदनगरला शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे ( वय 50 ) असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.







