जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्याला शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी २७ कोटीचा निधी प्राप्त आहे. भाजप मात्र १ तारखेला शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहे. सरावासाठी , आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी भाजपने मोर्चा काढावाच बरेच दिवसात त्यांनी विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावलेली नाहीये. मुळात ते ज्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत, त्या मागण्या आधीच पूर्ण झाल्या आहेत , अशा शब्दात आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या शेतकरी मोर्चाची खिल्ली उडवली

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की , शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या राज्य सरकारच्या यादीतून जळगाव जिल्हा वगळला हा भाजपचा कांगावा होता वीज बिल वसुलीबद्दलही त्यांनी असाच कांगावा केला मात्र वस्तुस्थिती आहे की साधारण ४ ते ५ हजारापर्यंत असलेले चालू वीज बिल भरले तरी कृषिपंपांची वीज जोडणी कायम राहणार आहे
जिल्हाबँकेच्या निवडणुकीत सगळे एकत्र असावे म्हणून सर्वपक्षीय पॅनलची मी पुढाकार घेतला होता हे मी आजपण मान्य करतो मात्र पुढे काही अनपेक्षित घटना घडल्या आणि निवडणूक बिनविरोध होऊ शकलेली नाही तरीही निवडणुकीनंतर शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेत सगळ्यांनी एकत्र येऊन काम कारवाई अशी माझी भूमिका राहणार आहे , असेही त्यांनी सांगितले .
कोरोनाकाळापासून विविध सरकारीं विभागाचा कामाचा वेग मंदावला आहे हे खरे असले तरी परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या बाबतीत पुढच्या २० ते २५ दिवसात कामात सुधारणा अपेक्षित आहे त्यासाठी पुन्हा जिल्हा परिषदेत स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे , असेही ते म्हणाले .







