जळगाव ( प्रतिनिधी ) – रोजगारासाठी पात्र (45 वर्षाच्या आतील) माजी सैनिकांमधून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये राज्यात सुरक्षा रक्षकाच्या जागा भरल्या जाणार आहेत
या पदासाठी 1 ऑक्टोबररोजी वय 45 वर्षापेक्षा कमी असावे, शिक्षण 8 वी किंवा समकक्ष पण 12 वी पास नसावा, सैन्यसेवा कमीत कमी 15 वर्ष झालेली असावी, सैन्य दलातील हुद्दा हवालदार पदापेक्षा कमी अथवा समकक्ष असावा, चारित्र्य चांगले असावे

इच्छुक व पात्र माजी सैनिकांनी डिसचार्ज बुक, पी.पी.ओ. एम्पलॉयमेंट कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र व इतर सैन्य कागदांपत्रासह कार्यालयीन वेळेत 8 नोव्हेंबरपर्यंत नांव नोदवावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0257-2241414 वर संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी केले आहे.







