जळगाव;- शहरातील रामेश्वर कॉलनी भागात अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांची माहिती अशी की, संशयित आरोपी मनोज श्रीधर महाजन (वय-३३) रा. खंडेराव नगर, पिंप्राळा हा शहरातील रामेश्वर कॉलनी परीसरात रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास एका कापडाच्या पिशवीत देशी दारू विक्री करतांना आढळून आला. एमआयडीसी पोलीसांनी त्याला अटक करत त्यांच्या ताब्यातील १ हजार ३०० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली. पोकॉ गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स.फौ, आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, पो.कॉ. हेमंत कळसकर यांनी केली.