फैजपूर ( प्रतिनिधी ) – धनाजी नाना महाविद्यालयात आज राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग, शिक्षण सहसंचालक कार्यालय व नगरपालिका दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे मोफत कोरोना लसीकरण करण्यात आले

या मोफत लसीकरण शिबिराचे उद्घाटन आमदार शिरिष चौधरी यांनी केले . यावेळी प्रमुख अतिथी म्ह्णून न प मुख्याधिकारी संदीप चिद्रवार उपस्थित होते याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लसी घेण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी कोरोनायोद्धा डॉ.समीर सय्यद , आरोग्य सल्लागार किशोर महाजन, आरोग्यसेविका अलका वैदकर, संगणक ऑपरेटर दिनेश गोयल, पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी लसीकरण कॅम्प आयोजनामागील भूमिका विशद केली.
कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात मार्गदर्शन प्राचार्य डॉ. पी. आर.चौधरी, उपप्राचार्य प्रा.ए. जी.सरोदे, डॉ. ए. आय. भंगाळे, डॉ. उदय जगताप, प्रा. डी. बी. तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. शेरसिंग पाडवी, प्रा. हरीश तळेले, नितीन सपकाळे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. सरला तडवी यांनी केले . आभार डॉ. गोपाळ कोल्हे यांनी मानले.







