मुंबई (वृत्तसंस्था) – दादरमध्ये बसला मोठा अपघात झाला. ही बस मरोळ आगाराची असल्याची माहिती समोर आली आहे. या बसनं दादरमध्ये सकाळी एका डंपरला जोरदार धडक दिली. या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये वाहक, चालकांचा समावेश आहे. जखमी झालेल्या ८ जणांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलं आहे. या फुटेजमध्ये अपघाताची तीव्रता दिसून येत आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसनं डंपरला मागून जोरदार धडक दिली. बसने समोरील कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. बसच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालं. काचांचा चक्काचूर झाला. यामध्ये बस वाहक, बस चालक आणि सहा प्रवासी जखमी झाले. वाहक, चालक आणि तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. तर तीन प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर आहे.