जळगाव (प्रतिनिधी) – कोणताही बडेजाव न मिरवता सामान्यांच्या मदतीसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील सातत्याने प्रयत्नशील असतात याचा प्रत्यय आज पुन्हा आला रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या शेतकर्याला ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ मदत केली.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे दुपारी दापोरा येथून उमाळ्याकडे जात होते. त्यांना रस्त्यावर अपघातात जखमी झालेला व्यक्ती विव्हळत असल्याचे दिसले. ना. पाटील यांनी तातडीने ताफ्याला थांबवून अपघातग्रस्ताशी वार्तालाप केला. संबंधीत व्यक्तीला मुका मार लागल्याचे त्यांना दिसून आले. पालकमंत्र्यांनी तातडीने आपल्या ताफ्यातील वाहन देऊन संबंधीत व्यक्तीवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडून दिले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत जि प सदस्य पवन सोनवणे, आदिवासी कोळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते.