नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – एका 12 वर्षाच्या मुलीने तिच्या 13 वर्षाच्या मैत्रिणीसोबत मिळून आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना घडली या मुलीचे वडील पोलीस अधिकारी होते. मुलीने पित्याची चाकूने भोकसून हत्या केली. हा प्रकार ब्राझीलमध्ये घडला
‘ब्राझीलच्या सांता कॅटरिना येथील 46 वर्षीय नेफे लुईझ वेरलंगच्या हत्येचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दोन मुलींना अटक केली. आरोपी मुलगी मृत पोलीस अधिकारी वेरलांग यांची मुलगी आहे.
हत्या करण्याचं कारण म्हणजे त्यांना सुसान लुईस वॉन रिचथोफेनसारखे प्रसिद्ध व्हायचं होतं. या मुलींनी प्रसिद्धीसाठी हा खून केल्याचे सांगण्यात येत आहे. या विक्षिप्त मुलीला 2002 च्या खून खटल्यापासून प्रेरणा मिळाली (सुसान लुईस वॉन रिचथोफेन प्रकरण).
20 वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये सुझान (सुझान लुईस वॉन रिचथोफेन) नावाच्या मुलीने तिच्या पालकांची हत्या केली होती. सुझानने तिचा मित्र आणि प्रियकराच्या मदतीने ही हत्या केली होती.