जळगाव ( प्रतिनिधी )- जिल्हा बँक निवणुकीतील लढतीचा अंदाज घेऊन काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पुढची रणनीती ठरवली जाणार आहे सर्वपक्षीय पॅनलच्या भाजपच्या प्रयत्नांना सर्वात आधी काँग्रेसनेच सुरुंग लावल्याने आता उद्याच्या बैठकीत भाजपला प्रत्यक्ष प्रचारात तापदायक ठरणारी नव्याने आणि अनपेक्षित काही भूमिका घेतली जाईल का ? , अशी चर्चा सुरु आहे .
जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडून आलेल्या जागा लक्षात घेऊन प्रत्यक्ष लढवल्या जाणाऱ्या जागांच्या हिशोबाने आता काँग्रेसचे १४ उमेदवार मैदानात आहेत . कालच भाजपच्या भूमिकेची चिरफाड करणारी पत्रपरिषद घेतली होती . पराभव दिसू लागल्याने जिल्ह्यातील भाजप नेते आता राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीवर आरोप करीत आहेत असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे .
जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सर्वपक्षीय पॅनल नाकारल्यापासून चर्चेत आहेत आता त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष कसे डावपेच लढवणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे आपल्या १४ उमेदवारांपैकी कोणते उमेदवार बिनविरोध आणले जाऊ शकतात त्यासाठी माघारीच्या तारखेपर्यंत काय करावे लागेल याचाही विचार या बैठकीत केला जाणार आहे लढत द्यावी लागणाऱ्या उमेदवारांचा प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार असेल तर महाविकास आघाडीची एकत्रित ताकद वापरण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या त्या त्या भागातील प्रभावी पदाधिकाऱ्यांना नेमकी काय जबाबदारी द्यायची याचाही ताळमेळ या बैठकीत बसवला जाणार आहे कालच राष्ट्रवादीने सांगितले आहे की आता महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे नियोजन लवकरच केले जाईल त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात घेतल्या जाणाऱ्या भूमिकेचीही चर्चा उद्या काँग्रेसच्या बैठकीत होणार आहे