मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलीवूडचा अभिनेता शाहरूख खान याच्या व्यवस्थापक पूजा ददलानी यांनी आज सकाळी एनसीबीच्या कार्यालयात भेट दिली. त्या एक बंद लखोटा घेऊन एनसीबीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या.
त्या सकाळी दहाच्या सुमाराला कार्यालयात आल्या आणि सुमारे तासभर त्या तिथे होत्या. कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला पण त्या काहीही न बोलता तेथून निघून गेल्या.
गेल्या गुरुवारी एनसीबीच्या पथकाने शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याला भेट देऊन तिथे पाहणी केली होती. तपासाच्या संबंधात त्यांनी शाहरूख खानकडून काही कागदपत्रे मागून घेतली आहेत. काल शुक्रवारी सायंकाळी शाहरूखचा बॉडीगार्ड काही कागदपत्रे घेऊन एनसीबीच्या कार्यालयात गेला होता.