चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – गावात जाऊन येतो, असे सांगून घरातून गेलेला तरूण बेपत्ता झाल्याची घटना जुनोने येथे घडली चाळीसगाव ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
जुनोने येथील शेख सलमान शेख सलीम (वय-२२) हा रविवारी घरच्यांना गावात जाऊन येतो, असे सांगून गेला. मात्र तो घरी परतला नाही. म्हणून घरच्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु तो मिळून आला नाही. शेख सलमान शेख सलीम हा हरवल्याची खात्री झाल्यानंतर वडील शेख सलीम शेख गुलाब यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास ओंकार सुतार हे करीत आहेत.