जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या प्रक्रियेत यंत्रणेला हाताशी धरून आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला असा आमदार राजूमामा भोळे यांचा आरोप तर्कहीन आहे , त्यांना पराभव दिसत असल्याने ते असे बोलत आहेत असे आज माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी स्पष्ट केले . महाविकास आघाडीचे या निवडणुकीसाठीचे जागावाटप लवकरच होईल असेही ते म्हणाले .
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील , माजी मंत्री सतीश पाटील , रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीतील या पत्रपरिषदेत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर पुढे म्हणाले की , २० तारखेला झालेली जिल्हा बँकेच्या उमेदवारांच्या अर्जाच्या छाननीची प्रक्रिया नियमानुसारच व पारदर्शक झाली आहे आम्ही कुणावरही अन्याय केलेला नाही आमदार भोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आणि निवडणूक निर्णय अधिकारी बिडवई यांच्यावरही आरोप केले ते चुकीचेच आहेत ते सत्तेचा दुरुपयोग केला म्हणत आहेत पण तसा काही पुरावा आलेला नाही बिडवई यांच्यावर झालेल्या आरोपांचा खुलासा त्यांनी त्यांच्या स्तरावर केलेला आहे या पूर्ण प्रक्रियेत त्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे होते , व्हिडीओ शूटिंग झाले होते सगळ्याच उमेदवारांचे सूचक आणि अनुमोदक तेथे होते ते अधिकाऱ्यांना बोलू शकले असते आता भाजपच्या पायाखालची वाळू घसरते आहे हे त्यांना दिसते आहे म्हणून ते असे बोलत आहेत , असे आरोप त्यांच्याकडून केले जात आहेत, हे आमचे मत आहे . कुणावरही अन्याय करण्याचा उद्देश समोर आलेला दिसत नाही सहकारात विकासाचे काम झाले पाहिजे आमदार मामापण जिल्हा बँकेचे संचालक होते आमच्या संचालक मंडळाने गेल्या ५ ते ६ वर्षात वायफळ खर्च केलेला नाही रोहिणी खडसे – खेवलकर यांनी या संचालक मंडळाचे नेतृत्व केले लेखापरीक्षकांनी आमच्या कामाचे कौतुक केले आहे ते रेकॉर्डवर आहे संचालक मंडळाने काटकसरीने कामे केलेली आहेत मतदार जागरूक आहेत कुणी कशी कामे केली हे मतदारांना माहिती आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आता महाविकास आघाडीचे पॅनल तयार होणार आहे आमच्या आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मते मिळतील अशी आमची खात्री आहे आमचे संचालक मंडळ सत्तेवर येण्यापूर्वी जिल्हा बँक २५० कोटी रुपयांच्या तोट्यात होती हा तोटा आम्ही जवळपास २०० कोटींनी भरून काढला आहे आता फक्त ६५ कोटी रुपयांचा तोटा राहिलेला आहे १ रुपयाचाही वैयक्तिक फायदा कोणत्याही संचालकाने घेतलेला नाही पुन्हा आम्ही ६५ कोटी रुपयांचा तोटा भरून काढू बँकेची वसुलीही महत्वाची असते जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकाच्या तुलनेत सर्वाधिक वित्तपुरवठा शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने केला आहे बँक नफ्यात आणून आम्ही सभासदांना आम्ही पुन्हा लाभांश व बोनस देउ सर्वपक्षीय पॅनलच्या प्रयत्नात राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वासघात केला असे भाजपनेते म्हणत असले तरी त्यांच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही या प्रयत्नात ३ बैठक झाल्या तोपर्यंत सगळे ठीक होते नंतर मात्र परिस्थिती अचानक बदलली राज्यात भाजपकडून राष्ट्रवादी , शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांना त्रास दिला जातो , असे असतानाही भाजपला या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोबत घयावे हे पटण्यासारखे नव्हते . त्यामुळे आमच्या नेत्यांनी आम्हाला आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील नेत्यांना भाजपला बाजूला ठेवण्याचे आदेश दिले पुढे बाजार समित्या आणि न्या निवडणुकांमध्ये भाजप विरोधातच राहणार असल्याने फक्त याच निवडणुकीत भाजपला सोबत का घ्यायचे असा हा प्रश्न होता आम्ही सर्वपक्षीय पॅनल नाकारण्याआधी ३ दिवस त्यांना तशा सूचना दिल्याही होत्या मला आमदार राजूमामा भोळे यांचा फोन आला होता मी त्यांना तुम्ही तुमच्या सगळ्या उमेदवारांचे अर्ज भरू शकता पुढे सर्वपक्षीय पॅनल झालेच तर पाहूत असे सांगितले होते . यात आम्ही त्यांचा विश्वासघात करण्याचा प्रश्न आहेच कुठे ? . आता आघाडीच्या जागावाटपाचे नियोजन केले जाणार आहे , असेही ते म्हणाले .
यावेळी माजी मंत्री सतीश पाटील यांनीही भाजप नेत्यांच्या चुकांवर बोट ठेवले . ते म्हणाले की , आमदार मंगेश चव्हाण , पारोळ्याचे नगराध्यक्ष करणं पवार पतसंस्थांचे थकबाकीदार आहेत आमच्याकडे पुरावे आहेत पण आम्ही त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला नाही तसा आक्षेप आम्ही घेऊ शकलो असतो मुद्दाम त्यांना मैदानात हरवू अशी आम्ही भूमिका घेतली आमदार मंगेश चव्हाण नाशिकच्या घडामोडींपासून खूप मोठी व्यक्ती झालेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वपक्षीय जागावाटपाचे फक्त आकडे जाहीर केले होते आणि असेही सांगितले होते की चारही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून जिल्ह्यातील नेत्यांना हिरवा कंदील मिळाल्यावरच हे सर्वपक्षीय पॅनल अस्तित्वात येईल त्यामुळे आमचा विश्वासघात झाला असे भाजप नेत्यांनी म्हणूच नये , असेही ते म्हणाले .