जळगाव ;- भोरस ग्रामपंचायतीकडून कोरोना विषाणू विरूध्दच्या लढ्यात सहभागी होऊन सेवा देणाऱ्या गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांना प्रोत्साहनपर भत्ता म्हणून प्रत्येकी १००० रुपयांचा चेक वितरीत करण्यात आला. यावेळी
प.स.उपसभापती सुनील पाटील सरपंच सौ. योगिता प्रमोद पाटील उपसरपंच युवराज काकळीज ग्रामविकास अधिकारी एस एम पाटील पाटील, ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते .