जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील शाहुनगरातील आश्विनी हॉस्पिटलसमोरून ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
युवराज प्रकाश वाणी (वय-२९ ,रा. शाहुनगर ) हे हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे कामासाठी लागणारी (एमएच १९ सीएम ४४४६) क्रमांकाची दुचाकी आहे. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले युवराज वाणी यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो ना राजकुमार चव्हाण करीत आहे.