मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – भाजपकडून सीबीआय , आयटी , ईडीचा राजकीय दडपशाहीसाठीच वापर होतो आहे हे सामान्य जनतेलाही समजते आहे असे आज आमदार रोहित पवार यांनी सांगितले .
मुक्ताईच्या दर्शनाला आलेले आमदार रोहित पवार माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की , दसऱ्याच्या दिवशी माझ्या मतदारसंघात भारतातील सर्वात उंच अशा भगव्या ध्वजाची स्थापना करण्यात आली आहे अनेक धार्मिक ठिकाणांवर या ध्वजाचे पूजन झाले आहे त्याचाच एक भाग म्हणून मी पण राज्यात फिरताना धार्मिक ठिकाणांवर जाऊन दर्शन घेतो आहे आज मुक्ताईच्या दर्शनासाठी आलो आहे
राजकीय प्रश्नांची उत्तरे देताना आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की , राज्यात भाजप सरकार असतानाच अशा सीबीआय , आयटी , ईडीच्या कारवाया सुरु झाल्या होत्या . महाराष्ट्राबाहेरही त्यांनी हेच केले आहे मात्र महाराष्ट्रात भाजपाला पराभव स्वीकारावा लागला हा भाजपचा दडपशाहीचा मार्ग लोकांना न पटणारा आहे एखाद्याला घमेंड असते तो त्याचा वापर लोकांना फोडण्यासाठी करतो ह्यांच्या कारवायांचे कारण राजकीय आहे हे सर्वांना पटते आहे एकनाथराव खडसे यांची ताकद वेगळ्याच कारणामुळे कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे त्याचाच भाग हे ईडी प्रकरण असू शकते भाजपकडून सीबीआय , आयटी , ईडीचा राजकीय दडपशाहीसाठीच वापर होतो आहे सीबीआय , आयटीचे लोक सांगतात की आम्ही ईडीला पुरावे दिले आहेत मग ईडी काहीच का बोलत नाही ? , पुरावे दिले असतील तर ईडी काय करते ?, अन्य पक्षाचेच नव्हे तर भाजपमधील काही नेते लोकप्रिय होत असतील तर अशा बहुजन नेत्यांची ताकदसुद्धा अशी कमी केली जाते भाजपमधील बहुजन नेत्यांचेही नाव खराब केले जाते मात्र लोक आपल्यासोबत असतील तर त्यात काळजी करण्यासारखे काही नाही असे आमच्यासारख्याला वाटते , असेही ते म्हणाले .
आमदार रोहित पवार यांनी यावेळी वारकऱ्यांना समवेत चर्चा केली . जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांची भेट घेंवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महा विकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर अशाच प्रकारे इडी सीबीआयमार्फत कार्यवाही केली जात असून यामागे फक्त राजकारण असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी मुक्ताईनगर येथे केला आहे.