जळगाव ( प्रतिनिधी ) – रस्त्यात सापडलेल्या पाकिटाच्या मालकाचा शोध घेऊन त्यातील पैसे आणि कागदपत्रे जशीच्या तशी परत करणाऱ्या २ विद्यर्थ्यांचा आज मुख्यालयातील पोलीस उप अधीक्षक ( होम ) विठ्ठल ससे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हिमांशु रितेश छाजेड ( विनोबानगर ) व संभव उल्हास जैन ( शिवरामनगर ) हे दोघे मित्र बुधवारी सकाळी सायकलिंगचा सराव करत असताना शिरसोली मार्गावरील कृष्ण लॉन्सजवळ त्यांना पाकीट सापडले होते, त्यांनी पाकीट उघडल्यावर ते नशिराबाद्चे पंकज रंधे यांचे असल्याचे समजले . पाकिटात काही महत्वाची कागदपत्रे आणि दीड हजार रुपये होते या दोघांनी पंकज रंधे यांच्याशी संपर्क साधून त्यांना हे पाकीट परत केले . हिमांशू छाजेड व संभव जैन हे रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल या शाळेचे विद्यार्थी आहेत . या दोघांचा या प्रामाणिकपणाबद्दल मुख्यालयातील पोलीस उप अधीक्षक ( होम ) विठ्ठल ससे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.