चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगावामधील वयोवृद्ध दुचाकीस्वार शहराकडे येत असताना भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला बालाजी नगरजवळ ही घटना घडली अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .
महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथील कमलाकर काशीराम जंगले (वय-६२) हे दुचाकीवरून (क्र. एम.एच.१५ ए.एफ. ८७५८) मालेगाव कडून चाळीसगावाकडे येत असताना अचानक अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात कमलाकर जंगले हे जागीच ठार झाले. हि घटना मालेगाव – चाळीसगाव रोडवरील बालाजी नगराजवळ घडली. घटना घडताच अज्ञात वाहन धारक पसार झाला.
अकस्मात मृत्यूच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर मुलगा राकेश जंगले यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन कायदा १८४,१३४(ब) प्रमाणे अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास मुकेश पाटील करीत आहेत.