नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात कोरोनाचे वाढते संक्रमण चिंतेचा विषय बनत असताना आता आता मणिपूरमधून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. गोव्यानंतर आता मणिपूरही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुक्त राज्य झाले आहे. यापूर्वी गोवा राज्य रविवारी कोरोना मुक्त झाल्याचे सांगण्यात आले होते.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी याविषयी माहिती दिली. मणिपूर हे आता कोरोनामुक्त राज्य झाल्याची माहिती सांगताना खूप आनंद होत आहे. दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. राज्यात आता एकही कोरोनाचा रुग्ण नाही असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी गोवा देशातील पहिले कोरोना विषाणू मुक्त राज्य ठरले होते. येथील सर्व रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-१९ चे सर्व सात रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सर्वांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.