जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यात ६ वर्षीय व ७ वर्षीय वयाच्या दोन बहिणींवर तरुणाने लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. बुधवारी नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर संशयित तरुणाला अटक करण्यात आली.
तालुक्यात दोन्ही चिमुकल्या मुली कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी त्याच गावात राहणारा तरुण मुलींच्या घरी गेला होता. त्याने दोघां चिमुकल्या बहिणीवर लैगिंक अत्याचार केला. घटनेची माहिती समोर आल्यानंतर पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी नशीराबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरुन अत्याचारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली. पुढील तपास स पो नि अनिल मोरे करीत आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा संशयित तरुणास न्यायालयात हजर करण्याची कारवाई सुरु होती.