जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पाचोरा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून आमदार किशोर पाटील ३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
आमदार किशोर पाटील , सतीश शिंदे , सीमा पाटील यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील हेच प्रबळ उमेदवार समजले जात असले तरी अन्य दोन उमेदवारांनी माघार न घेतल्यास आमदार किशोर पाटील यांचे विरोधक या दोघांपैकी एका उमेदवाराला बळ देऊन आमदार किशोर पाटील यांना बेजार करू शकतात. त्यामुळे पक्षीय राजकारणात कोण वरचढ ठरतो हे प्रचाराच्या काळातील घडामोडींमध्येच स्पष्ट होणार आहे. सध्या पाचोरा तालुक्यात काँग्रेस पक्षांचाही प्रभाव थोडाफार समोर येऊ लागल्याने आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरची सार्वत्रिक नाराजी तीव्र होत असल्याने आमदार किशोर पाटील यांना गाफील राहून चालणार नाही असे पाचोरा तालुक्यातील जाणकार सांगत आहेत.