जळगाव ( प्रतिनिधी )– जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भुसावळ तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून ४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत
आमदार संजय सावकारे , भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे , शांताराम धनगर आणि राजेंद्र चौधरी यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत . भाजपचे आमदार असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्याशी आमदार संजय सावकारे यांचे जवळचे संबंध आहे.
विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघात त्यांना आता कशी साथ देते हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे . नगराध्यक्ष रमण भोळे यांचा संपर्क आणि शेतकऱ्यांमधील प्रतिमा लक्षात घेऊन ते विरोधकांचा कसा मुकाबला करतात या मुद्द्यावर आता भुसावळ तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे . या तालुक्यात आता पडद्याआडच्या घडामोडी महत्वाच्या ठरणार आहेत कारण राष्ट्रवादीतील हितसंबंध आमदार संजय सावकारे यांच्याकडून वापरले जाऊ शकतात त्याच वेळी अशा घडामोडी घडल्या तर काय करायचे हे भाजपला आणि राष्ट्रवादीलाही डोळ्यात तेल घालून परिस्थिती आणि वातावरण समजून घ्यावे लागणार आहे .