जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँक निवडणुकीत विरोधकांचे अर्ज बाद झाल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे , आ. अनिल भाईदास पाटील , अँड.रवींद्र भैया पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा बँक निवडणूकीत मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे . बोदवड विकास सोसायटी मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांचादेखील संचालक होण्याचा मार्ग सुकर झाला आहे . भाजपला सर्वात मोठा धक्का देणारी बातमी म्हणजे माजी आमदार स्मिताताई वाघ यांचा अंमळनेर विकास सोसायटी मतदार संघात उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांची बिनविरोध निवड झालेले आहे.







