जळगाव ( प्रतिनिधी )– शहरातील कासमवाडी भागात जुन्या वादातून एका तरुणाला चार आरोपींनी मारहाण केली होती त्यापैकी पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीला न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

शहरातील शंकरनगर , कासमवाडी भागात १६ ऑक्टोबररोजी मध्यरात्री ही मारहाणीची घटना घडली होती . फिर्यादी प्रशांत चौधरी याला आरोपींनी फोन करून रचना कॉलोनीतून कासामवाडी येथे बोलावून घेतले होते तेथे अमन सोनवणे , रोहित भालेराव ( दोघे रा – कासामवाडी ) सुनील राठोड , अनिल राठोड या चार आरोपींची जुन्या वादातून आणि वडिलांची चिकनची गाडी कशी लावतो असे म्हणत लाथा बुक्क्यांनी , चाकू ,लाकडी दांडा , दगडाने मारहाण केली होती , हे भांडण सोडवायला गेलेले मयूर मराठे यांनाही आरोपींनी मारहाण केली होती यापैकी अमन सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे
प्रशांत चौधरी यांच्या फिर्यादीवरून या चार आरोपींविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गु र न ६८० / २०२१ भा द वि ३२६ , ३२४ , ३२३ , ५०४, ५०६ ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या आरोपीला पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी , सुनील सोनार, प्रदीप पाटील, साईनाथ मुंडे यांनी त्याचे राहत्या घरातून ताब्यात घेतले होते त्याच अटक करण्यात आली होती आज न्या ए एस शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कस्टडी रिमांड मिळालेली आहे सरकारतर्फे ऍड स्वाती निकम यांनी काम पाहिले







