जळगाव ( प्रतिनिधी ) – मेहरूण तलाव भागात देवीच्या विसर्जनाच्या ठिकाणी बंदोबस्ताला नेमलेल्या पोलिसांनी काल पॅण्टमध्ये सूरा लपवून फिरणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले
या तरुणाविरोधात पो कॉ संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेहरूण तलाव भागात देवीच्या विसर्जनाच्या ठिकाणी बंदोबस्ताला संदीप पाटील यांच्यासह पो उ नि दीपक जमधांडे , पो हे कॉ अल्ताफ पठाण , अलका माळी , दीप्ती नेमाडे , सोनी महेकर , होमगार्ड धीरज भगत , रुपाली इंगळे , सविता गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली होती या भागात फिरणाऱ्या आरोपीच्या हालचाली या पथकाला संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी करून झडती घेतल्यावर त्याने पॅण्टमध्ये १६ इंच लांबीचा सूरा सापडला होता . पोलिसांनी पंचनामा करून हा सुरा जप्त केला जयेश नाझरकर ( रा – के सी पार्क , गजानननगर , जळगाव ) असे या आरोपीचे नाव आहे.