जळगाव ( प्रतिनिधी )- ट्रकचालकाचे इनव्हाईस , मोबाइलला , रोकड चोरणाऱ्या २ चोरांना ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत
फिर्यादी जालिंदर आंधळे यांनी पोलिसांना सांगितले की , शहरातील एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजाराजवळ त्यांची ट्रक ( क्र एम एच ०४ – एफपी ३०१९ ) च्या कॅबिनमधुन चोरांनी ब्ल्यू टूथ , इनव्हाईस , मोबाइल , रोकड २ हजार रुपये चोरले होते . त्यांच्या ट्रकच्या शेजारच्या प्रवीण पाटील यांच्या एम एच १९- झेड – ३५९९ क्रमांकाच्या ट्रकमधून मोबाईल चोरला होता हा मोबाइल चोरांनी वांजोळा येथील ब्रिजलाल पाटील यांना विकला होता पोलिसांनी तपास करून आरोपी गणेश कोळी ( रा – कडगाव , ता – जळगाव )आणि गोविंदा बाविस्कर ( रा – श्रीरामनगर , भुसावळ ) या दोघांना १६ ऑक्टोबररोजी अटक केली आहे त्यांच्याकडून आणखी मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात केली होती
या दोन्ही आरोपीवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यांनी हा गुन्हा केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यावर त्यांना कडगाव येथून सहाय्यक फौजदार अतुल वंजारी , इम्रान सय्यद, मुदस्सर काजी , गणेश शिरसाळे , साईनाथ मुंडे यांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला होता इतर मुद्देमाल हस्तगत करणे बाकी असल्याने त्यांची न्यायालयाकडून वीस ऑक्टोबरपावेतो पोलिस कस्टडी मिळालेली आहे आरोपीवर यापूर्वी चार ते पाच गुन्हे अशा प्रकारचे दाखल आहे ते मालट्रक चालक झोपल्यानंतर अशा प्रकारचे गुन्हे करतात.